जानोरीत गावठी भट्टी उद्ध्वस्त
सावदा पोलिसांची धडक कारवाई : 13 हजारांचे गावठी दारूचे रसायन केले नष्ट
सावदा : तालुक्यातील जानोरी गावाच्या शिवारात गावठी हातभट्टीवर सावदा पोलिसांनी रविवारी धाड टाकत 13 हजार रुपये किंमतीचे 600 लिटर रसायन नष्ट केले. सहा.पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांच्यासह सहकार्यांनी जानोरी गावाच्या शिवारातील भवानी नाल्यावरील गावठी हातभट्टीवर कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपहा.निरीक्षक देविदास इंगोले, हवालदार देवेंद्र पाटील, रीजवान तडवी, उपनिरीक्षक राजेंद्र पवार आदींनी ही कारवाई केली. कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी यापुढे देखील धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे इंगोले म्हणाले.

