डॉ.आंबेडकर नगर-यशवंतपुर दरम्यान विशेष गाडी
भुसावळ : रेल्वे प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत डॉ.आंबेडकर नगर-यशवंतपुर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डाऊन 09301 विशेष गाडी 28 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी डॉ.आंबेडकर नगरहुन आठ वाजता रवाना झाल्यानंतर तिसर्या दिवशी यशवंतपुर 11.00 वाजता पोहोचेल. या गाडीला डाऊन दिशेला चांदूरबाजार, नवी अमरावती, अकोला येथे थांबा देण्यात आला आहे. अप 09302 विशेष गाडी 2 मार्चपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी यशवंतपूरहून 3.40 वाजता रवाना झाल्यानंतर तिसर्या दिवशी डॉ.आंबेडकर नगरला 7.15 वाजता पोहोचेल. या गाडीला अप दिशेला अकोला, नवी अमरावती व चांदुर बाजार स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी मिळेल शिवाय प्रवाशांना कोविड नियमांचे पालन करावे लागेल.

