कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अट्रावलचा मुंजोबा यात्रोत्सव रद्द


यावल : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील अट्रावल येथील मुजोंबाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. सोमवारी मुंजोबाचा वार असल्याने भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली मात्र वाढती गर्दी पाहता तहसीलदार महेश पवार व यावलचे निरीक्षक सुधीर पाटील यांनी देवस्थान समितीला 10 हजार रुपयांचा दंड करून मंदिर बंद केले. मंदिर बंद झाल्याने भाविकांना माघारी फिरावे लागले.

स्वयंपाकाच्या सामानासह भाविक परतले
अनेक भाविकांचे सोमवारी मान असल्याने स्वयंपाकाच्या सामानासह मंदिर परीसरात भाविक आले होते मात्र परीरातून भाविकांना परतावे लागले. काहींनी मानाचा स्वयंपाक मंदिरापासून दुरवरच्या शेतामध्ये करीत तेथूनच मुंजोबाला नैवेद्य प्रदान केला. मंदिर शासनाकडून बंद केल्याचे भाविकांना माहित नसल्याने दिवसभर भाविक अट्रावलपर्यंत गेले माात्र पोलिसांनी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर बॅरीकेटस् लावून ठेवल्याने गावापासूनच भाविकांना माघारी फिरावे लागले. पोलिस निरीक्षक सुधील पाटील व सहकारी तसेच मंदिर समिती देवस्थान परीसरात दिवसभर थांबुन भाविकांना त्यांनी परत जाण्याचे आवाहन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !