निंभोर्‍यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी साडे चारकोटी मंजूर


पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे केला होता पाठपुरावा

रावेर : रावेर तालुक्यातील निंभोरा आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे साडे चार कोटींच्या कामाला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी पाठपुरावा पाठपुरावा केला होता. निंभोरा येथे असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली होती. यासाठी जिल्हा परीरषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी पाठपुरावा केला होता. अखेर शासनाकडून निंभोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकामासाठी सुमारे साडे चार कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रशासकीय मान्यतेत 4 कोटी 41 लाख 71 हजार 187 रुयांची मंजूरी मिळाली आहे. लवकरच येथे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !