दहिगावात महिलेची टपरी पेटवली


दहिगाव, ता.यावल : सावखेडासीम रस्त्यालगत असलेल्या सुमन धनराज पाटील या महिलेची गोळ्या-बिस्किटे विकण्याची टपरी अज्ञात इसमाने 22 फेब्रुवारीचे रात्री जाळली. या घटनेत सुमारे 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही टपरी जळत असताना ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी महिलेस माहिती दिल्यानंतर लागलीच आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. दहिगाव पोलिस चौकीचे महेबूब तडवी, सिकंदर तडवी, राहुल महाजन तपास करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !