मिरगव्हाण शिवारातील अकृषक जमिनीचा परवाना अखेर रद्द


भुसावळ- जामनेर रोडवरील मिरगव्हाण शिवारातील गट नंबर 94/1अ/2 चा अकृषिक परवाना रद्द तसेच गट नंबर 94/1अ/1, 94/1 ब आणि 94/2 जमिनीवरील बांधकाम अगर हस्तांतरणास मनाई करण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी काढले आहेत. मिरगव्हाण, ता.भुसावळ शिवारात येणारी जामनेररोडवरील साईबाबा मंदिर परीसरातील गट नंबर गट नंबर 94/1अ/2 या गटास दिलेला अकृषिक परवाना रद्द करण्यात आला असून त्यानुसार त्या गटावरील सर्व नोंदी रद्द करुन जमीन मालक ज.मु.दिनेश मोहनलाल राठी आणि इतरांचे नाव इतर हक्कातून कमी करून सातबारा उतार्‍याच्या कब्जेदार सदरी दाखल करण्याचे आदेश आरटीएस / पूर्ननिरीक्षण/ क्र. 825/2018 च्या अपील निर्णयावर उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी 5 सप्टेंबर रोजी दिले. तसेच गट नंबर 94/1अ/1, 94/1 ब आणि 94/2 एकूण क्षेत्रफळ 5 हेक्टर 64 आर या जमिनीचा शेतव्यतिरिक्त उपयोग करताना पूर्व परवानगी न घेता कुळ कायदा कलम 43 व त्याखालील नियमांचा कुळ कमलाबाई शंकरलाल बेहरा व इतर यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे सदर जमिनीवर उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या रीट पीटीशन यात अंतीम निकाल लागेपर्यंत या चारही गटातील जमिनीच्या एकूण क्षेत्रफळ 5 हेक्टर 64 आर या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम अगर हस्तांतरण हे मालमत्ता धारण करणार्‍याने करु नये, असे आदेश टेनन्सी अपील क्रमांक 26/ 2018 च्या अपील निर्णयावर उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी 5 सप्टेंबर रोजी दिले आहेत. या निर्णयामुळे आता कुळ कायद्याच्या जमिनीवर परवानगी न घेता अकृषक जमिनींचा मुद्दा पून्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील इतर काही जमिनींची प्रकरणेदेखील या निमित्ताने समोर %E


कॉपी करू नका.