मध्य रेल्वे सरव्यवस्थापकांकडून चाळीसगाव-भुसावळ तिसर्या लाईनचे निरीक्षण
भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी बुधवारी चाळीसगाव-भुसावळ तिसरी लाईनचे विंडो ट्रेलिंगद्वारा निरीक्षण केले. या निरीक्षणात त्यांनी तिसर्या लाईनच्या कार्याचा आढावा घेतला. भुसावळ येथे नवीनच करण्यात आलेले श्वान पथक (डॉग स्काड), रेल्वे सुरक्षा बल कार्यालयाचे त्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच रेल्वे खेल-कूद मैदानाचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणात मंडल रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

