वाळू माफियांची दादागिरी : प्रांताधिकार्यांच्या वाहनाला डंपरची धडक
यावल : मुजोर वाळू माफियांनी दादागिरी करीत थेट फैजपूर प्रांताधिकारी यांच्या वाहनाला धडक दिल्याची घटना न्हावी येथे 24 रोजी रात्री घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
डंपरसह चारचाकी पोलिसांकडून जप्त
फैजपूर प्रांत कैलास कडलग हे चालक उमेश तळेकर वाळू वाहतूक करणार्या डंपरचा पाठलाग करीत असताना त्यांचे शासकीय वाहन (एम.एच.19 एम.0708) ला डंपर (एम.एच.19 झेड. 4749) ने जोरदार धडक दिली. या कृत्याला चारचाकी (एम.एच.19 बी.एल. 1010) वरील चालक-मालक ज्ञानेश्वर नामदेव कोळी (रा.कोळन्हावी) याने या प्रकाराला साथ दिल्याने कोळी यांच्यासह डंपर चालक महेंद्र धनराज तायडे, अर्जुन बाविस्कर (रा.पुनगाव, ता.चोपडा), चंद्रकांत सोळुंके (रा.कोळन्हावी) यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी कडलग यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डंपरसह महागडी चारचाकी जप्त केली आहे. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे व सहकारी करीत आहेत.

