थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित : वरणगावात उद्या भाजपाचे आंदोलन


वरणगाव : शहरात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी हनुमान नगरातील मनोहर गोविंदा चंदखेडकर यांना 16 हजार वीज बिल दिल्यानंतर त्यातील चार हजार रुपये भरतो आणि उर्वरीत सुद्धा टप्या-टप्याने, भरतो हप्ते पाडून द्या, कोरोना काळात माझ्या हाताला काम नाही माझा मुलगा बारावीत असून त्याला अभ्यास करम्यास अडचणी येतील, असे वारंवार वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सांगूनही संबंधितानी चंदखेडकर यांच्याकडील 24 रोजी वीज कनेक्शन कट गेले. वीज कंपनीच्या या कृती विरोधात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा कायदे आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, उपाध्यक्ष हितेश चौधरी वॉर्ड नंबर 10 अध्यक्ष मिलिंद भैसे यांनी धाव घेतली तसेच तसेच वीज कंपनीच्या कृती विरोधात शुक्रवारी जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !