रायपुरच्या सरपंचपदी रूपेश पाटील यांची बिनविरोध निवड


रावेर : तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी रूपेश युवराज पाटील या 23 वर्षीय युवकाची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी तुकाराम तायडे यांची वर्णी लागली. रायपूर ग्रामपंचायतीसाठी सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रावेरचे पुरवठा अधिकारी हर्षल पाटील होते. सरपंचपदी रुपेश युवराज पाटील यांची तर उपसरपंचपदी तुकाराम सखाराम तायडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई तायडे, माधुरी चौधरी, प्रकाश तायडे, संजय तायडे, लताबाई भोई, कमलाबाई सपकाळे, रूपाली तायडे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक शरद कोळी व तलाठी कांबळे यांनी सहकार्य केले. सरपंच रुपेश पाटील गहूखेडा-रायपुर विकासाचे चेअरमन हेमराज पंडितराव पाटील यांचे पुतणे आहेत. निवडीबद्दल राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !