अहमदाबाद-बरोनी, बलसाड-कानपूर, हापा-बिलासपूरसाठी धावणार विशेष गाडी


भुसावळ : रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद-बरोनी, बलसाड-कानपूर ,हापा-बिलासपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबाद-बरोनी विशेष गाडी
डाउन 09483 अहमदाबाद-बरोनी विशेष गाडी विशेष गाडी 1 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद येथून दररोज 12.25 वाजता सुटल्यानंतर दिवशी सायंकाळी 6.40 वाजता बरोनीला पोहोचेल. अप 09484 बरोनी-अहमदाबाद विशेष गाडी 3 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत फैजाबाद येथून प्रतिदिन 7.30 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 12.40 वाजता अहमदाबादला पोहोचेल. या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

बलसाड-कानपूर सुपरफास्ट साप्ताहिक गाडी
डाऊन 09243 बलसाड-कानपूर सुपरफास्ट साप्ताहिक गाडी 24 फेब्रुवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बलसाड येथून दर बुधवारी 10.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 7.30 वाजता कानपूरला पोहोचेल. अप 09244 कानपूर-बलसाड विशेष गाडी 26 फेब्रुवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत कानपूर येथून दर शुक्रवारी आठ वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 5.40 वाजता बलसाडला पोहोचेल. या गाडीला जळगावसह भुसावळ व खंडवा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

हापा-बिलासपूर साप्ताहिक सुपरफास्ट गाडी
डाऊन 09239 हापा-बिलासपूर साप्ताहिक सुपरफास्ट गाडी 27 फेब्रुवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत हापा येथून दर शनिवारी 9.55 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 3.00 वाजता बिलासपूर येथे पोहोचणार आहे. अप 09240 बिलासपूर-हापा साप्ताहिक सुपरफास्ट गाडी 10 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बिलासपूर येथून दर सोमवारी 10.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 3.30 वाजता हापाला पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !