प्रांताधिकार्‍यांच्या गाडीवर हल्ला : रावेरात महसूलचे कामबंद आंदोलन


रावेर : प्रांताधिकारी कैलास कडलग हे अवैध गौण खनिजाच्या डंपराचा पाठलाग करीत असताना वाळू माफियांनी त्यांच्या शासकीय वाहनाला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असताना शुक्रवारी महसूल कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करीत डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. दिवसभर महसूल विभागातर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, यावल तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार संघटना, तलाठी संघटना, कोतवाल संघटेनेतर्फे हल्ल्या निषेध करून उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना निवेदन देण्यात आले.

एकीकडे कर्तव्यपरायणता दुसरीकडे तिलांजली
एकीकडे मध्यरात्री जीव धोक्यात घालून प्रांताधिकारी वाळू माफियांवर कारवाई करीत असताना दुसरीकडे रावेर तालुक्यात महसूलच पथकाने जप्त ट्रॅक्टर-टॉली सोडून दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दाखवलेल्या हिंमतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !