शिक्षकांनो कर्तव्य सोडून पुढारीपणा करू नका !


रावेरात पंचायत समिती सदस्य जितू पाटील व दीपक पाटील यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची केली कान उघाडणी

रावेर : शिक्षकांनी पुढारीपणा न करता मुलांना ज्ञानदान करण्याचे कर्तव्य करावे मात्र काही शिक्षक दारू पिऊन धिंगाणा घालतात आणि तुम्हाला काहीच माहिती केस नाही ? असा प्रश्न करत पंचायत समिती सदस्य जितु पाटील व दीपक पाटील यांनी गटशिक्षणधिकारी एस.डी.दखणे यांची चांगलीच कान उघाडणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्यांमुळे रावेर पंचायत समितीची मासिक सभा चांगलीच गाजली. मागील आठवड्यात दोन जणांचा खड्डे चुकवतांना अपघाती मृत्यू झाला होता. लवकरात-लवकर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

यांच्या उपस्थितीत झाली सभा
पंचायत समितीत मासिक आढावा बैठक सभापती कविता कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, दीपक पाटील, योगेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते. सभेचे कामकाज गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी पाहिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी बैठकीला जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे उपमुख्य अधिकारी चंद्रशेखर चोपडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, बांधकाम अभियंता पराग पाटील, डी.आर.महाजन, सार्वजनिक बांधकामचे तायडे, महाजन, विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे यांच्यासह सिंचन विभाग एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !