भुसावळात महिलेवर बलात्कार : संशयीत पोलिसांच्या नजरेत


भुसावळ : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी रात्री 25 ते 30 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा अत्यंत बारकाईने पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहकार्‍यांनी तपास केला असून संशयीत पोलिसांच्या नजरेत असल्याची माहिती आहे. लाल रंगाच्या दुचाकीच्या आधारे पोलिसांनी संशयीताचा शोध घेतल्याचे समजते. संशयीताच्या अटकेसाठी तीन पथक तयार करण्यात आले होते तसेच सीसीटीव्ही फुटेज, महिलेने सांगितल्यावरून वर्णनावरील स्केचच्या आधारे संशयीतापर्यंत पोलिस पोहोचल्याचे सूत्रांकडून समजते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !