यावल पालिकेचे चोरलेले वीज पंप केळीच्या शेतात आढळले


शेत मालकाने दिली पोलिसांना माहिती : चोरट्यांना शोधण्याचे यावल पोलिसांपुढे आव्हान !

यावल :  यावल पालिकेच्या साठवण तलावातून दोन वीज पंपाची व केबलची चोरी तसेच एका शेतकर्‍याच्या शेतातून वीज पंपाची चोरी झाल्याची घटना 25 रोजी रात्री घडली होती. एकूण चार लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होवून तपास सुरू असतानाच शनिवारी सकाळी चोरी गेलेले इलेक्ट्रिक पंप साठवण तलावा पासून काही अंतरावर असलेल्या अभय फेगडे यांच्या केळीच्या शेतात शेतमजुरांना आढळले. पंप आढळले असलेतरी मूळ चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

यावल पोलिसात दाखल होता गुन्हा
बोरावल रस्त्यावर पालिकेचा साठवण तलाव असून त्यावरून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचवण्यासाठी तीस एचपी चे दोन पंप यावल नगरपरीषदेने बसविले आहेत शिवाय या पंपांना व वीज जोडणीसाठी लावलेली 60 मीटर वायर चोरट्यांनी लांबविली होती. या तलावाच्या जवळ असलेल्या डॉ.सतीश यावलकर यांच्या शेतातून 45 हजार रुपयाचे इलेक्ट्रिक पंप चोरट्यांनी लांबविले होते. याप्रकरणी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता रमाकांत मोरे, शेतकरी डॉ.सतीश यावलकर यांच्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे 26 रोजी यावल पोलिसात दाखल करण्यात आले होते.

शेतमजुरांना आढळले पंप
उपनिरीक्षक् विनोद खांडबहाले व हवालदार संजय तायडे यांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा करीत पुढील चौकशी सुरू केली होत.ी या चोरीच्या घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये व संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली होती. शनिवार, 27 रोजी सकाळी साठवण तलावाजवळ असलेल्या तसेच यावल शहरातील अभय फेगडे यांच्या केळीच्या शेतात केळीच्या पत्तीखाली चोरीस गेलेले इलेक्ट्रिक पंप लपवून ठेवले असल्याचे शेतकरी मजुरांना दिसून आले. त्यांनी ही माहिती शेठ मालकास सांगितल्याने शेतमालक अभय फेगडे यांनी यावल पोलीस स्टेशनची संपर्क साधला. यावल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेतला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !