वाळूचे ट्रॅक्टर सोडले : महसूल पथकाकडून प्रांत कार्यालयात खुलासे सादर


अहवाल पाहून निर्णय घेणार : प्रांताधिकारी कैलास कडलग

रावेर : अवैध वाळूचे ट्रॅक्टर-ट्रॉली सोडल्या प्रकरणी महसूल पथकाकडून प्रांतधिकारी कार्यालयात गुरुवारी खुलासे सादर करण्यात आले असूनसंबधितांचे खुलासे अद्याप पाहिलेले नाहीत, सोमवारी ते पाहून त्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याची माहिती प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दिली. 10 फेब्रुवारी रोजी अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर-ट्रॉली रावेरच्या महसूल पथकाने पकडले होते व तहसील कार्यालयात सुध्दा नेले होते परंतु कोणताही दंड न घेता तहसील कार्यालयातून वाहने सोडण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी सर्वांना खुलासे सादर करण्याचे आदेश दिले होते. अखेर 15 दिवसानंतर सर्वांच्या खुलास्यांचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. आता संबधित पथकाने कोणती कारणे दिली आहे व त्यावर प्रांत काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !