वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ला समर्थ पर्याय : विनोद सोनवणे
बोदवड : बहुजन समाजातील वंचित घटकांना आपला सामाजिक, राजकीय, आर्थिक, व शैक्षणिक विकास साधायचा असेल तर अॅड.बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हा समर्थ पर्याय असेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले. ते बोदवड येथे नवीन कार्यकर्ते पक्ष प्रवेश व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी अण्णा रेणुके, भास्कर गुरचळ, अनिल गायकवाड, अरुण बोदडे, रमेश तेलंग, बादशहा भाई, शांताराम मोरे, आशिष गुरचळ, नितीन (छोटू) सपकाळे आदींनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बोदडे, प्रमोद तायडे, नंदू तायडे, विलास होडगरे, विकास होडगरे, सोपान होडगरे यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, उपाध्यक्ष महेंद्र सुरळकर, जिल्हा संघटक शे.सलीम शे खलील, तालुकाध्यक्ष सुपदा निकम, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गुरचळ, गोपीचंद सुरवाडे, अशोक तायडे, विद्यासागर खरात, देवदत्त मकासरे, बंटी सोनवणे, प्रवीण मोरे, कैलास बोदडेंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

