जळगावात पिस्तुलाच्या धाकावर 15 लाखांची लूट
जळगाव : पिस्तुलाच्या धाकावर 15 लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना पंचमुखी हनुमान मंदिराजवळील पद्मावती मंगल कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी घडली. महेश चंद्रमोहन भावसार (53, रा.दीक्षीतवाडी, जळगाव) आणि संजय सुधाकर विभांडीक (51, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे सोमवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास 15 लाख रुपयांची रोकड घेऊन सिव्हील हॉस्पीटलच्या दिशेने जात लुटारूंनी दुचाकी अडवत पिस्तुलाचा धाक दाखवून रोकड लांवबली मात्र यावेळी झालेल्या झटापटीत रीव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. एक चोरटा दुचाकीवरून तर दुसरा पळत जाऊन घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

