सावदा शहरातील आठवडे बाजार बंद


सावदा : कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी 22 पासून आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सावदा नगरपरीषदेतर्फे शहरातील विविध भागात दररोज दवंडी देऊन आठवडे बाजार बंद असल्याबाबत माहिती दिली जात आहे शिवाय नागरीकांना गर्दी न करता व्यवहार करण्याचे आवाहन केले जता आहे. रविवार, 28 रोजीदेखील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. नागरीकांनीदेखील प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आठवडे बाजार परीसरात शुकशुकाट दिसून आला.

पालिका प्रशासनाचे अचूक नियोजन
आठवडे बाजार बंद असल्याने शहरातील विविध भागात ग्राहक व भाजीपाला विक्रेते व इतर किरकोळ विक्रेते यांच्यामुळे होणार्‍या गर्दीची शक्यता वाटत असल्यामुळे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, कर निरीक्षक अनिलकुमार आहुजा, आरोग्य निरीक्षक महेश चौधरी, लिपिक अरुण ठोसरे, आकाश तायडे, धीरज बनसोडे यांच्या पथकाने रविवारी शहरात गर्दी होऊ न देण्याचे नियोजन केल्यामुळे कोणत्याही स्वरूपाची गर्दी झाली नाही.


भाजीपाला विक्रेत्यांनी मास्क लावून केले व्यहवार
शहरात गुरांची मोठी बाजारपेठ असून सावद्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतदेखील कमी व्यवहार झाले. तथापि शहरातील डेली मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी देखील मास्कचा वापर करून त्यांचे व्यवहार पूर्ण केले. आत्तापर्यंत सावदा नगरपरीषदेने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्‍या 220 नागरीकांवर कारवाई करून एकूण 43 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला. नागरीकांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर नगरपरीषदेला सहकार्य केल्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी सर्व नागरीकांचे आभार व्यक्त केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !