भुसावळ विभागातील 40 कर्मचारी सेवानिवृत्त
भुसावळ : रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातून 26 फेब्रुवारी रोजी 40 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मचार्यांना रेल्वेतर्फे 10 कोटी 46 लाख त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वेद्वारा व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन सहा.कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचीत सन्मान व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे करण्यात आले तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन खंडवा, नांदगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक, बर्हाणपूर, जळगाव आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ मंडळ लेखा अधिकारी चंद्रकांत कदम यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे व सर्व सहा.कार्मिक अधिकारी व वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सहा.कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी निपटान, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

