भुसावळात ग्रामीण रुग्णालयात अतिरीक्त जनरेटर बसवा


शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांची आरोग्य विभागाकडे मागणी

भुसावळ : शहरातील ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास 95 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरीत कामांमध्ये प्रामुख्याने वीज समस्या सोडवण्यासाठी एक्सप्रेस फिडर आणि उच्चदाब असलेले ग्रामीण रुग्णालयात अतिरीक्त जनरेटर सार्वजनिक आरोग्य विभागाने बसवावे, अशी मागणी विभागाकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.

शिवसेना पाठपुरावा करणार
कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 मार्च 2021 रोजी दुपारी एक वाजेपासून रुग्णालयात विजेअभावी लसीकरण होऊ शकले नाही, नागरीकांना दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी फेर्‍या माराव्या लागल्या. इमारतीचे जवळपास 95 टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम झाले असून नियोजन नसल्याने विद्युत उपकेंद्र, एक्सप्रेस फिडरची उभारणी, अग्निशमन यंत्रणा, वातानुकुलीत यंत्रणा व अन्य सुविधांची कामे खोळंबली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व पदाधिकारी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार आहे.


स्वतंत्र एक्सप्रेस फिडरची आवश्यकता
रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा आहे. सतत वीज खंडित होत असल्यामुळे रुग्ण दगावू शकतो. इथे फिडर स्वतंत्र नसल्यामुळे वीज खंडित झाल्यानंतर महावितरणकडून लवकर दखल घेतली जात नही. येथे स्वतंत्र फिडरची आवश्यकता आहे म्हणून आरोग्य विभागाकडे मागणी केली, असल्याचे प्रा.धीरज पाटील यांनी कळविले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !