नियमांचे उल्लंघण करीत लग्न सोहळा : मंगल कार्यालय चालकाला पाच हजारांचा दड
शिरपूर : शहरातील करवंद नाक्यावरील एका मंगल कार्यालयात लग्न समारंभात नियमांपेक्षा जास्तीची गर्दी आढळून आल्याने कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी 28 फेब्रुवारी 2021 शिरपूर शहर पोलीस व नगरपालिकेने संयुक्त कार्यवाही करीत मंगलकार्य चालकाला 5 हजार रुपयांचा दंड केला आहे. शिरपूर शहरातील करवंद नाक्यावरील मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये 28 फेब्रुवारी2021 रोजी सुरू लग्न समारंभात मोठ्या संख्येने गर्दी असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिस व नगरपालिकेचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथे लग्नसमारंभाच्या ठिकाणी जाऊन परीस्थिती पाहिली असता मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास आली. लग्नसमारंभात सोशल डिस्टनसिंग दिसून न आल्याने कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने मुकेश पटेल टाऊन हॉल कराराने चालविण्यासाठी घेतलेले चंद्रकांत धोंडु पाटील यांच्यावर 5 हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण बार्हे, संदीप रोकडे, चालक पंडीत मोरे, आरसीपीचे पथक व नगरपालिका कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली.


