अरे देवा ! : एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 336 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 62 हजार 102 वर : एकाच दिवसात 152 रुग्णांची कोरोनावर मात
जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे तब्बल 336 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1394 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 62 हजार 102 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 57 हजार 404 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 152 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 169
जळगाव ग्रामीण 14
भुसावळ 12
अमळनेर 03
चोपडा 51
पाचोरा 02
भडगाव 02
धरणगाव 16
यावल 08
एरंडोल 03
जामनेर 05
रावेर 05
पारोळा 09
चाळीसगाव 23
मुक्ताईनगर 09
बोदवड 02
अन्य जिल्हा 03

धक्कादायक : 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात यावल तालुक्यातील 71 वर्षीय पुरूष व 77 वर्षीय महिलेचा, एरंडोल तालुक्यातील 58 वर्षीय पुरूष, पाचोरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरूष, मुक्ताईनगर तालुक्यातील 65 वर्षीय पुरूषाचा मूत्यू झाला. तीन रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जळगाव व दोन मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगव येथे मृत्यू झाला.
