माजी मंत्री खडसे म्हणाले, विरोधकांनी माहिती घेवून बोलायला हवे होते !
आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव शहराची झाली नाहक बदनामी
जळगाव : आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव शहराची नाहक बदनामी झाली असून या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे, असं एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे. केवळ प्रसिद्धीसाठी विरोध पक्ष आसुसलेला दिसत असल्याचेदेखील खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
हे देखील वाचा : गृहमंत्री म्हणाले, जळगावच्या ‘आशादीप’ वस्तीगृहात तो प्रकार घडलाच नाही !

