डोकी फुटली तर दिल्लीला रडत जावू नका : खासदार संजय राऊतांचा गंभीर इशारा


मुंबई : बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावे लागेल. परीस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिल्यानंतर खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील एस.टी.ची वाहतूक ठप्प



आमच्याकडे बंदुका नाहीत का?
बेळगावात सुरू असलेली दडपशाही एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही, असे सांगत बेळगावातील हल्ल्यांवरून केंद्र सरकारवर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. राज्यातून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तत्काळ बेळगावला पाठवायला हवे, असे नाही केले तर सांगली कोल्हापूरमधील असंख्य नागरीक बेळगावात शिरतील. मी स्वतः बेळगावला जायचा प्रयत्न करत आहे. मी बेळगावात जाऊ शकतो. तिथल्या असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत. बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचे म्हटले की आम्हाला बंदुका दाखवतात. आमच्याकडे बंदुका नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असे म्हणत पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !