यावलमध्ये रंगल्या कुस्त्यांच्या दंगली
पेहरन शरीफनिमित्त आयोजन : देशभरातील 210 नामवंत मल्लांचा सहभाग
यावल- पेहरन शरीफनिमित्त यावल शहरातील बाबानगरात रविवारी कुस्त्यांच्या दंगली रंगल्या. हरीयाणा, मध्यप्रदेश, पंजाब येथील 210 मल्लांनी आखाडा गाजवला. शहरात दरवर्षी कुस्त्यांची दंगल नदीपात्रात होते मात्र यंदा पात्रात पाणी असल्याने दंगल बाबानगर भागात रंगली. आमदंगल पाहण्यासाठी शहरात हजारोंच्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती. पंच म्हणून मुस्ताक पहेलवान, रशीद पहेलवान यांनी काम पाहिले. तर कुस्त्यांच्या दंगलीसाठी अय्युब खान, हकीम खान, सईद खान, शकील खान, अल्ताफ खान आदींनी परीश्रम घेतले.
शेख अल्ताफ यांनी सूत्रसंचालन केले. पोलीस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार असलम खान व पोलीस कर्मचार्यांनी या ठिकाणी बंदोबस्त राखला.
मुक्का पहिलवानाने मारली बाजी
शहरातील मुक्का पैलवान यांची लढत चाळीसगावच्या मल्लाशी झाली तर मुक्का पहेलवानाने बाजी मारली तर चाळीसगावच्या मल्लाला पायाला जबर दुखापत झाल्याने त्यास सामना सोडावा लागला.