घरकुल घोटाळा : आरोपींच्या जामिनावर आता 18 रोजी खंडपीठात सुनावणी


जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यातील शिक्षा सुनावलेल्या 28 आरोपींच्या जामिनावर आता 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपींना धुळे न्यायालयाने यपूर्वीच शिक्षा सुनावली आहे तर आरोपी तुरुंगात आहेत. 28 आरोपींनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला असून सोमवार, 16 सप्टेंबर रोजी या अर्जावर सुनावणी होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली असून आता 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व न्यायमूर्ती के.के.सोनवणे यांच्या खंडपीठासमोर कामकाज झाले.


कॉपी करू नका.