p>

यावलच्या शिक्षकाचा दिल्लीत राष्ट्रीक शिक्षक रत्न पुरस्काराने गौरव


यावल- दिल्लीत नुकतेच अखिल भारतीय प्रतिभा संमेलन झाले. त्यात यावलचे शिक्षक शेख जावेद शेख याकुब यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, अमलोक रतन कोहली, ज्ञानेश्वर मुळे, हाजी शकील सैफी, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.विशाखा सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे करण्यात आले.


कॉपी करू नका.