भुसावळात उद्या अंनिसची बैठक
भुसावळ- अंधश्रध्दा निर्मूलन समितीची बैठक शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दुपारी चार वाजता होत आहे. बैठकीत प्रदूषणमुक्त गणेश विसर्जन केलेल्या गणेश उत्सव मंडळ व कार्यकर्ते यांचा सत्कार केला जाणार आहे. तालुक्यात वाढत्या बुवा बाबाच्या तक्रारी तसेच दिवाळी अंकाचे वितरण याबाबत चर्चा केली जाणार आहे. यावेळी नवीन सदस्यांची नोंदणी होणार असून उपस्थितीचे आवाहन शाखाध्यक्ष शांताराम जाधव, अरुण दामोदर, कार्याध्याक्ष शामकुमार वासनिक, सागर बहिरुणे, रवींद्र अहिरे, मनोजकुमार नंदागवळी यांनी केले आहे.