लॉकअपबाहेर शुटींग : एकाविरुद्ध गुन्हा


जळगाव : दोन दिवसांपूर्वी शहरातील महावितरण कार्यालयात झालेल्या प्रकारणात अटकेत असलेले चाळीसगाव तालुक्यातील 30 ते 40 शेतकर्‍यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून 27 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रवीण शिवाजी मराठे (45, रा. हिरापूर रोड इच्छादेवी नगर, चाळीसगाव) हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आला. त्याठिकाणी अटकेत असलेल्या संशयीत आरोपींना भेटत असतांना त्यांनी लॉकअपसमोर व्हिडीओ शुट केली. व्हिडीओ शुट करण्यास कोणतीही परवानगी नसतांना शासकीय कामाची गोपनियता भंग केल्याप्रकरणी पोलिस नाईक राजेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.निरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.

 


कॉपी करू नका.