रेल्वे कर्मचार्‍यांसाठी 15 जूनला ऑनलाईन पेन्शन अदालत


भुसावळ : सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी 15 जून रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ डीआरएम कार्यालयात ऑनलाईन पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शनर धारकांनी मोबाइलवर संपर्क करून ई – मेल च्या द्वारे पेंशन धारकांच्या तक्रारींचे शासनाच्या वर्तमान दिशा निर्देशानुसार तत्परतेने निराकरण केला जाईल. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांनी आपल्या तक्रारींचे अर्ज वरिष्ट मंडल कार्मिक अधिकारी, भुसावळ यांना ऑनलाइन ईमेलवर संबंधहत संकेत स्थळावर सादर करावेत. र्जात आपले नाव, पदनाम, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरुप इत्यादी नमुद कराव, व अर्जासोबत पास बुकची झेरॉक्स, पी.पी.ओ.ची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स स्व सत्यापित करून पीडीएफमधे ई मेलवर पाठवावे तसेच अर्ज जमा करण्याची अंतीम तारीख 30 एप्रिल असल्याचे कळवण्यात आले आहे.


कॉपी करू नका.