पिंप्री चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई


पुणे : पिंप्री चिंचवड पोलिस आयुक्तपदी संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली असून पिंप्रीचे आयुक्त आर.के.पद्मनाभन यांची बदली करण्यात आली. याबाबत शुक्रवारी गृह विभागाने आदेश जारी केले. पुणे शहरासह पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीचे विभाजन केल्यानंतर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली होती. विष्णोई हे मुंबईतील वैधमापनशास्त्र नियंत्रक पदावरून बदलून येत आहेत. दरम्यान, पद्मनाभन यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.


कॉपी करू नका.