सावदा पालिकेच्या सभेत सहा विषयांना मंजुर
सावदा : सावदा नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवार, 29 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले होत्या. सभे समोर एकूण सहा विषय मांडण्यात आले. प्रथम मागील प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले. विषय क्रमांक एक खंडेराव देवस्थान क वर्ग तीर्थस्थळाचा विकास योजने ंतर्गत सभामंडप बांधकाम करण्यासाठी नाहरकत, व देखभाल दुरुस्ती करणे बाबत विचार करणे, विषय 2, 15 वा वित्त आयोगातून काम करण्यास मंजुरी, सफाई कर्मचारी यांच्या स्वेच्छा निवृत्ती, व कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे व कोरोनाच्या अनुषंगाने शहरातील नागरीकांना क्रीटीकल केअर सेंटर सीसीसी येथे पोहचविण्यासाठी भाडे तत्वावर रुग्णवाहिका गाडी भाड्याने घेण्याबाबत विचार करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेवक, नगरसेविका आदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

