सावद्यात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
सावदा : शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेक रुग्ण निघत आहे. दिवसागणिक यात वाढ होत आहे. वेळीच योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अश्या स्थितीत सावदासारख्या मोठ्या नगरपालिका क्षेत्रात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे फैजपूर प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली. निवेदनावर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यासह विनोद नेमाडे, मनीष भंगाळे, सुभाष माळी, यशवंत वाघूळदे, सागर चौधरी, सागर पाटील, प्रकाश नेमाडे, विवेक भंगाळे, शेख अजीम शेख खालील, रवींद्र नारखेडे यांच्यासह असंख्य नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.

