भुसावळात लग्नाच्या दणदणाटात पोलिसांकडून कारवाईचा सूर
नवरदेवाला मिरविणार्या बग्गीचालकालाही दंड : वर्हाडींमध्ये खळबळ
भुसावळ : शासनाने दिलेल्या निकषात लग्न सोहळा न करता मोठ्या प्रमाणावर वर्हाडीत जमवत डीजे लावून थाटात लग्न सुरू असल्याची तक्रार बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पालिका गुरुवारी पथकाला धाव घेत वाल्मीक नगरात धाव घेतली. वाल्मीक नगरातील विवाह सोहळ्यात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून एकाच मंडपात दोन विवाह सोहळा सुरू असतानाच निरीक्षक पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व पालिकेचे कर व प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, गोपाळ पाली यांच्यासह पथक धडकताच तक्रारीत तथ्य आढळले.
नियम डावलत थाटात लग्न : 20 हजारांचा दंड वसुल
पोलिस व पालिका प्रशासनाच्या अधिकार्यांनी सरकारने ठरवून दिलेले नियम मोडणे, गर्दी जमविणे, फिजीकल डीस्टन्सिग न पाळणे, अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याने पालिकेने गोपाळ ढोलपुरे यांच्या नावाने 20 हजार रूपये दंडांची पावती फाडली तर दोन नवरदेव बग्गीत बसवून मिरवणूक काढलेल्या बग्गी व्यावसायीक मोहन राजू चंदेले यांनाही पाच हजार रूपयांच्या दंडाची स्वतंत्र पावती पालिकेने फाडल्याने खळबळ उडाली. डीजेचा दणदणाट करणर्या व्यावसायीकाचा शोध सुरू असून त्याच्यावरही आता कारवाई होणार आहे.



