मुंबई-प्रयागराज चोकी दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरीक्त ट्रेन


भुसावळ : मय रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळ्यासाठी अतिरीक्त आरक्षित विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-प्रयागराज चोकी दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरीक्त ट्रेन
01257 मुंबई-प्रयागराज चौकी दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरीक्त ट्रेन दादर येथून 27 रोजी दोन वाजता सुटली असून दुसर्‍या दिवशी प्रयागराज चौकी 11.50 वाजता पोहोचली. 01258 विशेष प्रयागराज चोकी येथून 28 रोजी 1.30 वाजता सुटली असून दुसर्‍या दिवशी प्रयागराज चोकी 11.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावल, इटारसी, जबलपुर, सतना स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !