भुसावळातील उपद्रवींची लवकरच हद्दपारी
हद्दपारी प्रकरणातील तीन संशयीतांना म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांकडून नोटीस
भुसावळ : शहरातील सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या उपद्रींचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यावर सुनावणी होणार असून संबंधितांचे जबाब नोदविंण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी तीन जणांना नोटिसा पाठविल्या आहे. संबंधितांचे म्हणणे ऐकून हे प्रकरण प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविले जाणार आहे. त्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे.
गुन्हेगारीचा होणार बीमोड
भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून ते पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. अधीक्षक यांनी हे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविले असून प्रांताधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे डीवायएसपी वाघचौरे यांना सूचित केले आहे. त्यानुसार डीवायएसपी यांच्याकडून तीन जणांना हद्दपारी प्रकरणी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी डीवायएसपी यांनी नोटिसा काढल्या आहे. नुकत्याच पोलिसांनी या नोटिसा संबंधितांना बजाविल्या आहे. प्रत्येकाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी डीवायएसपी यांनी तारीख व वेळ ठरवून दिलेली आहे. त्यानुसार त्यांचे म्हणणे त्यांना मांडता येणार आहे. यात राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचे संकेत आहे. यामुळे या प्रस्तावांची चौकशी होऊन चौकशी अहवाल कधी प्रांताधिकार्यांकडे जातो, याकडे लक्ष लागले आहे.पालिका निवडणूकीपूर्वी हद्दपारीचे आदेश प्रांताधिकारी पारीत करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाकडून हद्दपारीच्या प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या नोटिसांमुळे संबधितांमध्ये खळबळ उडाली आहे.


