दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा : शिशिर जावळे


शिशिर जावळे यांची मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

भुसावळ : कोरोनाचा संपूर्ण जगाला विळखा घातला असून या विषाणू च्या संक्रमणामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे मृत्यू दर वाढत आहे. कोरोना संक्रमणामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक व्यवस्था कोलमडली, रोजगार बुडालेत, गोर-गरीब सर्व लोकांना आर्थिक टंचाइचा सामना करावा लागत आहेत. कुटुंबाच पालन-पोषण करणेही जड झालेलं आहे. अशातच पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क सुद्धा भरणे डोईजड झाले आहे. दुसरीकडे दहावी परीक्षेसाठी पालकांनी शैक्षणिक फी भरली असून आता परीक्षा रद्द झाल्याने ही परत केल्यास मोठा दिलासा मिळणार असल्याने दखल घेण्याची सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घ्यावी दखल
परीक्षा रद्द झाल्याने शासनाने परीक्षा शुल्क संबंधित प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये परत करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !