नंदीग्रामच्या निकालानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, हायकोर्टात न्याय मागणार
कोलकाता : नंदीग्राममधील निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती दिली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. सुरूवातीला ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती मात्र बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाल्याचे सांगण्यात आले. बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे आहे.

