भुसावळात 30 रक्तदात्यांनी केले रक्तदान
महाराणा प्रताप राजपूत समाज संघर्ष समितीचे शिबिराचे आयोजन
भुसावळ : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असताना दुरीकडे मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासत असल्याने सामाजिक भावनेतून 9 मे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार, 2 मे रोजी महाराणा प्रताप राजपूत समाज संघर्ष समिती भुसावळ तालुका द्वारा महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 30 दात्यांनी रक्तदान केले.
यांची होती उपस्थिती
हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांच्या प्रतिमेस प्रवीणसिंह पाटील, बापूसाहेब भगतसिंग राजपूत, संजयसिंग चौहान, समाधान महाजन, संग्रामसिंह सूर्यवंशी, यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान चालू असतांना गरजू रुग्ण स्त्रीला प्लाझ्माची गरज असल्याने रक्तदाते नितीन ढाके यांच्यामार्फत ती पूर्ण करण्यात आली. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी यावल समाजाध्यक्ष कृष्णा पाटील, यशवंत चौधरी, अमोल पाटील, सुनील चौधरी, बी.एन.पाटील, अभिजीत पाटील, नितीन पाटील, हर्षल पाटील, सोनी ठाकूर, गोपी राजपूत, रोशनसिंग राजपूत, नितीन पाटील आदींनी परीश्रम घेतले.



