भाजपा हा संकटात मदत करणारा पक्ष


खासदार रक्षाताई खडसे : रक्तदान शिबिरात 74 रक्तदात्यांचे रक्तदान

वरणगाव : कोरोना काळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीही राजकारण न करता संकटात सर्वात पुढे मदत करणारा पक्ष होय. आज वरणगावात 74 युवकांनी रक्तदान करून मरणार्‍याचे प्राण वाचविण्याचे पुण्य केले आहे. आज कोरोना काळात रुग्णांना सर्वात पुढे जाऊन जीवाची पर्वा न करता मदत करणारा हा भाजपाचा कार्यकर्ता असून मी देखील भाजपाची कार्यकर्ता असल्याचा अभिमनान असल्याचे येथे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते झाले. प्रमुख पाहुणे माजी मंत्री आमदार संजय सावकारे होते. सहकारमित्र श्री चंद्रकांत हरी बढे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शामराव धनगर, संजयकुमार जैन, माजी सरपंच सुभाष धनगर, गोलू राणे, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, महिला आघाडी शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, कामगार नेते मिलिंद मेढे, गजानन वंजारी, डी.के.खाटीक, संदीप माळी, कृष्णा माळी, माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, डॉ.प्रवीण चांदणे, सरचिटणीस कुंदन माळी, आकाश निमकर, तेजस जैन, उपाध्यक्ष हितेश चौधरी, मिलिंद भैसे, नटराज चौधरी, युसुफ खान उपस्थित होते. यावेळी लोककल्याण हॉस्पिटल कोव्हिडं सेंटरला विरोध करणारे अवसायक व त्यामागे जी विरोधी शक्ती आहे त्याचा निषेध भाजपाच्या वतीने करण्यात आला.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी भाजयुमोचे शहर उपाध्यक्ष पप्पू ठाकरे, बंटी सोनार, गोलू वंजारी, चेतन वंजारी, धीरज रूनवाल, शुभम आढाव, दीपक चौधरी, जयेश कपाटे, कमलाकर मराठे, राहुल जंजाळे, विलास नेमाडे यांनी परीश्रम घेतले. जळगाव येथील गोळवकर रक्तपेढीला रक्त सुपूर्द करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !