केळीला वाचविण्यासाठी हरीभाऊ जावळेकंडुन सेव्ह बनाना चळवळ


भारतीय कृषी अनुसंधान परीषद दिल्लीचे पथक येणार सीएमव्ही (हरण्या) रोगाच्या पाहणीला

रावेर- केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर-यावल तालुक्यात आता केळीवर सीएमव्ही विषाणूची लागण झाल्याने केळी उत्पादक संकटात सापडले आहेत. केळीवरील सीएमव्ही रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी करपा रोगाप्रमाणेच ‘सेव्ह बनाना’ ही चळवळ नामदार हरीभाऊनी सुरू केली आहे. शुक्रवारी पुण्यात पार पडलेल्या शास्त्रज्ञांच्या बैठकीत जावळे यांच्या सुचनेनुसार भारतीय अनुसंधान परीषद, दिल्लीतर्फे वरीष्ठ शास्त्रज्ञांचे शनिवारी रावेर-यावल तालुक्यातील काही भागांना भेट देवून पाहणी करणार आहेत शिवाय सायंकाळी पाच वाजता सावदा नगरपालिकेच्या सभागृहात शेतकर्‍यांशी सवांद साधणार आहेत.

केळी वाचवण्यासाठी महत्वाचे पाऊल
विविध प्रकारच्या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध प्रकारचे पॅकेजस सरकारकडून आणणे, केळीचा दर्जा वाढविण्यासाठी ‘सेव्ह बनाना’ ही चळवळ राबवली जाणार आहे. रावेर-यावल तालुक्यातील केळी वाचविण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल समजले मानले जात आहे.


कॉपी करू नका.