200 ग्राहकांना बेकायदा कोंडून व्यवसाय ; रावेरातील रूपम मॉल अखेर सील


कोरोना नियम बसवले धाब्यावर : मॉलमध्ये 200 ग्राहक नेत सुरू होता व्यवसाय

रावेर : कोरोना व्हायरसच्या सुपरस्प्रेडरला कारणीभूत ठरलेल्या रावेर शहरातील रुपम शॉपिंग (कापडाचे) मॉल पालिका प्रशासनान सील करीत मॉल मालक प्रकाश ललवाणी यांच्यासह त्याच्या मुलाला रावेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कोरोना नियमांचे उल्लंघण करून व्यवसाय करणार्‍या व्यावसायीकांमध्ये शहात मोठी खळबळ उडाली. कोरोना महामारी सुरू असून अनेक हातावर पोट असणारे कुटुंब घरात थांबुन कोरोना विरुध्द लढा देत आहे परंतु रूपम शॉपिंग मॉलच्या मालकाने शासन नियम पायदळी तुटवत सुमारे दोनशे पेक्षा ग्राहकांना बेकायदा मॉलमध्ये प्रवेश दिला त्यामुळे कोरोना व्हायरसच्या सुपरस्प्रेडला कारणीभुत ठरलेल्याने त्यांच्यावर महसूल नगर पालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉलमध्ये असलेल्या प्रति माणसे पाचशे रुपये दंड तर मॉलला दहा हजारांचा दंड करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !