अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांच्या कालावधीचा विस्तार


भुसावळ : मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 02905 ओखा-हावडा विशेष गाडी (रविवार) 27 जुनपर्यंत (9 फेरी) वाढविण्यात आली आहे. 02906 हावडा ओखा विशेष (मंगळवार) 27 जुनपर्यंत (9 फेरी) वाढविण्यात आली आहे. या विशेष गाड्यांच्या संरचनेत, थांब्यांमध्ये आणि वेळेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड 19 शी संबंधित सर्व नियमांचे व एसओपी पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !