विवरे बु॥ ग्रामपंचायतीवर वासुदेव नरवाडे पॅनलचे वर्चस्व !
15 पैकी 8 ते मिळाल्याने उपसरपंचपदी भाग्यश्री पाटील : गावाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही
रावेर : तालुक्यातील विवरे बु.॥ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर 12 फेब्रुवारी रोजी उपसरपंच निवड झाल्यानंतर महिनाभरातच 26 मार्च रोजी उपसरपंच नीलिमा सणंसे यांनी राजीनामा दिला परंतु राजीनामा पत्रावर बनावट सह्या असल्याचा आक्षेप वासुदेव नरवाडे गटाने घेतल्याने राजीनामा नामंजूर झाला. त्यानंतर उपसरपंच यांनी 23 एप्रिल रोजी राजीनामा दिल्याने मासिक बैठकीत राजीनामा मंजूर झाल्यामुळे रीक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक गुरुवार, 6 मे रोजी सरपंच इनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत वासुदेव नरवाडे गटाच्या भाग्यश्री विकास पाटील यांनी विपीन राणे व शिवाजी पाटील यांच्या गटाचे विनोद मोरे यांचा एकमताने पराभव केल्याने उपसरपंचपदी भाग्यश्री पाटील यांची निवड बहुमताने करण्यात आली.
निवडीनंतर निलिमा पाटील यांचा सत्कार
निलीमा सणसे यांच्या राजीनाम्याने रीक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी वासुदेव नरवाडे गटाकडून भाग्यश्री पाटील यांनी अर्ज भरला होता तर शिवाजी पाटील, विपीन राणे गटा कडून विनोद मोरे, मनिषा पाचपांडे यांनी अर्ज दाखल केला होता. मनिषा पाचपांडे यांनी माघार घेतल्यानंतर भाग्यश्री पाटील व विनोद मोरे यांच्यात मतदान पद्धतीने निवडणूक झाली. झालेल्या बैठकीत भाग्यश्री पाटील यांना 15 पैकी 8 मते मिळाल्याने त्यांची उपसरपंचपदी ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांनी निवड जाहीर केली. या प्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच भाग्यश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला.



यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला सरपंच इनुस तडवी, उपसरपंच भाग्यश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव नरवाडे, नेहा पाचपांडे, युसूफ खाटीक, रेखा गाढे, अमीनाबी शे.इस्माईल, ज्योती सपकाळ, दीपक राणे, पूनम बोंडे, मनिषा पाचपांडे, विनोद मोरे, विपीन राणे, शिवाजी पाटील, नीलीमा सणंसे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते उपस्थित होते.
गावाचा सर्वांगीण विकास करणार : मनीषा पाटील
गेल्या तीन महिन्यात व्यक्तीगत विरोधाशिवाय एकही काम मार्गी लागले नाही. म्हणून निवडणूकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी माजी सरपंच तथा पॅनलप्रमुख वासुदेव नरवाडे या अनुभवी नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे गटात सहभागी झाली. या ठिकाणी काम करण्यासाठी संधी आहे. उपसरपंचपदी माझी निवड करून विकास कामे करण्यासाठी संधी निर्माण करुन दिल्याने विरोध तथा भेदभाव न करता गावाचा सर्वांगीण विकास करणार आहे. पती विकास पाटील यांच्या जनसंपर्क व काम करण्याच्या हातोटीने अटी-तटीच्या लढतीत जिंकून आली. संधीचे सोनं करुन सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच भाग्यश्री पाटील यांनी म्हणाल्या.

