विखरणच्या विवाहितेचा पांझरा नदीत बुडाल्याने मृत्यू

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील देवीचे विखरण येथील विवाहितेचा तालुक्यातील कुसुंबा शिवारातून वाहणार्या पांझरा नदीच्या पात्रात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. निर्मलाबाई रामसिंग भील असे मृत विवाहितेचे नाव आहे. कुसुंब्यात रोजगारासाठी भील दाम्पत्य आले असून शुक्रवारी पहाटे निर्मलाबाई या प्रातःविधीसाठी गेल्यानंतर ते पांझरा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. गाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळला. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




