भुसावळात कोम्बिंग : दोन हद्दपार आरोपींना अटक
पाच समन्सची बजावणी ; नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपीला अटक
भुसावळ : भुसावळता उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात दोन हद्दपार आरोपींना अटक करण्यात आली. हेमंत ऊर्फ (सोन्या) जगदीश पैठणकर (27, रा.भिरुड हॉस्पिटलजवळ, भुसावळ) व चेतन ऊर्फ (गुल्या) पोपट खडसे (28, रा.हनुमान नगर, केळकर हॉस्पिटलजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी राबवले शहरात कोम्बिंग ऑपरेशन
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सहा.निरीक्षक कृष्णा भोये, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार वाल्मीक सोनवणे, कृष्णा देशमुख, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, चंद्रकांत बोदडे, समाधान पाटील, महेश चौधरी, यासीन पिंजारी, योगेश माळी, प्रशांत परदेशी, परेश बिर्हाडे , कर्तारसिंग परदेशी, सचिन चौधरी आदींनी केली.



