रावेर तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर छापे : 51 हजारांचा मुद्देमाल जप्त


रावेर : शहरासह तालुक्यात रावेर पोलिसांनी अवैध दारू विक्रेते, वाहतूक करणारे दारूभट्टीवाले यांच्यावर 4 ते 6 मे दरम्यान 21 छापे टाकून 50 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार रावेर पोलिसांनी शहर व तालुक्यातील अवैध दारू विक्रेते , दारूभट्टीवर कारवाई करत 21 आरोपींवर गुन्हा दाखल केला.

यांच्यावर झाली कारवाई
रावेर पोलिसांनी अखिल पतडवी (रा.खिरोदा प्र.), सुभाष सोनवणे (रा.रावेर), जगदीश पाटील (रा.वाघोड), निलेश महाजन (रा.भगवती नगर, रावेर), जावेद तडवी (रा.सहस्त्रलिंग), अस्लम तडवी (रा.मोरवाल), राजू तडवी, अयुब तडवी (रा.कुसुंबा खुर्द), श्रीराम बारेला (रा.निमड्या), ललिता राठोड (रा.पाल), रेहान तडवी (रा.भोकरी), ईश्वर गाढे (रा.अहिरवाडी), दीपक महाजन (रा.जुना सावदा रोड, रावेर), शरीफ तडवी (रा.मुंजलवाडी), राहुल सुरदास (रा.मुंजलवाडी), रुमसिंग बारेला (रा.गारखेडा), पिंटू तडवी( रा.मोरवाल), रघुनाथ धनगर (रा.मुंजलवाडी), फकिरा तायडे (रा.नेहता), मनोज तायडे (रा.अहिरवाडी), रघुनाथ तायडे (रा.अहिरवाडी) यांच्याकडून एकूण 50 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व 21 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक व पोलीस स्टाफने ही कारवाई केली. रावेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईने अवैध दारू करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !