जळगाव जिल्ह्यात या शहरात आढळले आज सर्वाधिक कोरोनाबाधीत
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 861 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 16 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 800 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2304 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 800 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 28 हजार 172 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 16 हजार 274 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत जळगाव शहर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, व चाळीसगाव शहरात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत.



शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 127
जळगाव ग्रामीण 32
भुसावळ 106
अमळनेर 36
चोपडा 47
पाचोरा 28
भडगाव 07
धरणगाव 15
यावल 24
एरंडोल 24
जामनेर 105
रावेर 70
पारोळा 35
चाळीसगाव 67
मुक्ताईनगर 81
बोदवड 36
अन्य जिल्हा 21
जळगाव जिल्ह्यात 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू
जळगाव- 04
अमळनेर- 03
जामनेर- 02
पाचोरा- 01
रावेर- 01
यावल- 01
भुसावळ- 01
मुक्ताईनगर- 01
चोपडा- 01
जळगाव तालुक्यातील- 01

