भुसावळातील खुनाला भांडण ठरले निमित्त : चाकूचे केले सपासप वार


भुसावळ : शहरातील पंजाबी मशीद परीसर, आगवाली चाळ परीसरात तरुणाच्या खुनाला आपसात भांडण ठरल्याचे निमित्त समोर आले आहे. मयत सुनील अरुण इंगळे (27) व संशयीत आरोपी शाबाज शहा (वय 22, भुसावळ) यांच्यात कुठल्यातरी विषयातून वादावादी झाल्यानंतर आरोापी शाबाजने सुनील इंगळे याच्या पोटात मध्यरात्री सपासप चाकूचे वार केल्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर आरोपीने मृतदेह झाकून ठेवला व दुसर्‍या दिवशी सकाळी शहर पोलिसांना स्वतःच पोलिस ठाण्यात येवून खून केल्याची माहिती दिली. सुरूवातीला या घटनेने पोलिसही चक्रावले मात्र त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना मृतदेह आढळल्याने तेदेखील हादरले.

जळगावात शवविच्छेदरन
शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुनील अरुण इंगळे (27) या तरुणाचा खुन झाल्याचे उघड झाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव येथून आलेल्या तज्ज्ञांनी घटनास्थळी पडलेल्या दगडावरील नमूने गोळा केले. शहर पोलिसात या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !